राजकीय मंदी
वात्रटिका
राजकीय मंदी
सत्ताधारी असे वावरतात
जणू ते स्वर्गावर आहेत
विरोधी पक्ष जवळजवळ
बंदच्या मार्गावर आहेत
विरोधी नेत्यांचे पक्षांतर
सत्तेसाठी संधी आहे
विरोधी पक्षांची अवस्था
राजकीय मंदी आहे....!!
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment