तीनशे सत्तर
वात्रटिका
#तीनशे सत्तर
ते इतके घातकी
हातात त्याने फत्तर होते
देश असून वेगळेपणाचे
कलम तीनशे सत्तर होते
विरोधासाठी विरोध नको
देशासाठी साथ द्या
फुटीरवाद्यांचा पुळका नको
एकीसाठी हात द्या
आपल्यालाच सारे कळते
असाही ताव नसावा
क्षमतेबाहेरच्या शब्दांनी
मोठेपणाचा आव नसावा
-श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment