तुडतुडे

वात्रटिका

#तुडतुडे

घाणीत वळवळणारे
काही किडे असतात
प्रसिद्धीसाठी टपकणारे
काही तुडतुडे असतात

दिसला मोका मारा चौका
ही त्यांची रीत असते
प्रकाशझोतात रहायचं
त्यांच्या मुखी गीत असते

आशा तुडतुड्यांचेही
अनेक अंधभक्त असतात
अक्कल कधी वापरत नाहीत
भलतेच सक्त असतात.....!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी