Posts

Showing posts from September, 2025

प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा

Image
◆●प्रा.भास्कर चंदनशिव- ग्रामीण मनाचा अक्षरमळा●◆ ◆श्रीकृष्ण उबाळे           मराठवाड्याच्या कोरड्या रानात जन्मलेलं एक लेकरू… लहानपणीच्या दुष्काळाच्या छायेत वाढलेलं… आयुष्याच्या सुरुवातीला खेड्यातल्या मळ्यात शेतकऱ्यांचे अश्रू पाहिलेलं… आणि ते अश्रू अक्षरांतून व्यक्त करून संपूर्ण मराठी साहित्यविश्वात घर करणारा लेखक म्हणजे भास्कर तात्याबा चंदनशिव. १२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या हासेगाव या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. मूळ नाव भास्कर देवराव यादव. पण दत्तक विधानानंतर ते झाले – भास्कर तात्याबा चंदनशिव. गावाकडच्या चुलीवर भाजलेल्या ज्वारीभाकरीसारखं साधं, खडतर आयुष्य त्यांनी जगलं. प्राथमिक शिक्षण गावात, आणि पुढं अंबाजोगाई-औरंगाबाद (संभाजीनगर) या शिक्षण प्रवासात त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. पण कितीही शिकले तरी मन त्यांचं रुतलेलं होतं ते मातीत. कारण निजामशाहीच्या काळातील मराठवाड्यातील दुष्काळ त्यांना सतत भेडसावत होता. १९६२ ते १९७२ या दशकभर त्यांनी दुष्काळाचा अभ्यास केला, त्याला जवळून पाहिलं. गावोगावी पोटापाण्यासाठी भट...

आठवणीतले प्रा.भास्कर चंदनशिव

Image
●◆आठवणीतले प्रा. भास्कर चंदनशिव◆● ◆श्रीकृष्ण उबाळे, बीड               २००१ साली मी बीडमधील बलभीम महाविद्यालयाच्या दारात पाऊल टाकलं. अकरावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून सुरुवात झाली आणि पुढे बारावी पार करून पदवीच्या प्रवासालाही मी तिथेच सुरुवात केली. त्या काळात बॉटनी, झूलॉजी, कम्प्युटर सायन्स हे विषय हाताळताना इंग्रजी आणि मराठी हे अनिवार्य विषय माझ्यासोबत असायचे. पण खरी गोडी, खरं आकर्षण, खरं वेगळेपण मराठी विभागामुळेच निर्माण झालं. मराठी विभागाचे प्रमुख होते प्रा.भास्कर चंदनशिव सर. साधेपणाने राहणारे, नेहमी नेहरू शर्टात दिसणारे, गंभीर आवाजात बोलणारे आणि त्यातही अनोखी ताकद असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या पहिल्याच व्याख्यानापासून मला जाणवलं की हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर लेखक, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. त्यांचे बोलणे म्हणजे एखाद्या कथेला ऐकण्यासारखे, एखाद्या पुस्तकाच्या पानात शिरल्यासारखे. लहानपणापासूनच आम्ही ‘लाल चिखल’ ही त्यांची कथा शाळेतून कित्येक वेळा वाचली होती. आणि आता तोच लेखक आपल्या समोर व्याख्यान देतो आहे, आपल्यालाच श...

सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव

Image
◆●सोनम वांगचुक यांच्या सन्मानातून दिसणारे वास्तव●◆               भारतात ज्ञान, शहाणपण आणि विद्वत्ता यांना प्राचीन काळापासून मोठं स्थान दिलं गेलं आहे. “विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन |     स्व-देशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ||”  हे संस्कृत सुभाषित केवळ वाक्य नसून भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. राजा आपल्या राज्यात पूजनीय असतो, पण विद्वान संपूर्ण जगात पूजनीय ठरतो. आज या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे लेह-लडाखचे सुपुत्र सोनम वांगचुक. अभियंता असूनही त्यांनी शिक्षण, पर्यावरण, शाश्वत विकास आणि हिमालयाच्या अस्तित्वासाठी आयुष्य समर्पित केलं. ‘आइस स्तुपा’ सारखा क्रांतिकारी शोध असो वा लष्करासाठी सौर-टेंटची संकल्पना – त्यांच्या कार्यात केवळ विज्ञान नव्हे तर समाजाला उपयोगी ठरणारी दूरदृष्टी दिसते.               त्यांच्या योगदानाचा गौरव भारतानेच नव्हे तर जगभराने केला आहे. 1996 पासून राज्यस्तरीय पदक, 2001 साली “मॅन ऑफ द इयर”, 2002 मध्ये अशोका फेलोशिप, 2014 मध्ये युनेस्को आर्किटेक्च...

शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग

Image
●◆शेतकरी बापाच्या आंबिका◆● शेतकरी बापाच्या शेतमळ्यावर मुलींनी फुलवली ‘खाकी’ची बाग नंदपूर येथील चंद्रसेन उबाळेंच्या चार मुली पोलीस दलात बजावताहेत सेवा बीड : बीड जिल्ह्याचा उल्लेख झाला की समाजमनात अजूनही काही कटू वास्तव दाटून येते – मुलगी नको अशी मानसिकता, गर्भपातात आघाडी, बालविवाहाची परंपरा… पण हाच बीड जिल्हा आज एका शेतकरी बापामुळे आणि त्याच्या चार मुलींमुळे अभिमानाने डोकं उंचावतो आहे. कारण गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील चंद्रसेन उबाळे या शेतकरी बापाच्या कष्टाच्या मळ्यावरून उभ्या राहिल्या आहेत चार खाकीधारी मुली. चंद्रसेन आणि संगिता उबाळे या दाम्पत्याने पाच मुलींच्या संगोपनात मुलगा-मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही. शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टींचं बी त्यांनी आपल्या मुलींच्या मनामनात पेरलं. “तुम्ही तुमचं स्वप्न पहा, कष्ट करा, प्रामाणिकपणे समाजात जगा,” या बोधवाक्यानंच उबाळे कुटुंब उभं राहिलं. यातूनच मोठी मुलगी ज्योती उबाळे हिने २०१४ मध्ये बीड जिल्हा पोलीस दलात भरती होऊन सध्या माजलगाव येथे सेवा सुरू आहे. दुसरी मुलगी अश्विनी उबाळे २०२१ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस द...

माझी बीजमाय 'संजीवनी'

Image
●◆माझी बीजमाय 'संजीवनी'◆●         तिचं नाव संजीवनी असलं तरी गावात सगळेजण तिला वहिनी म्हणतात. लहानपणापासून मी पण तिला वहिनीच म्हणायचो. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या सांगण्यावरून नकळत “आई” म्हणू लागलो. माझी ही माय – संजूबाई. शालेय शिक्षण तिचं झालेलं नाही. अक्षरं कधी हाताळली नाहीत. पण तिला शेतकीची, कुणबीकीची मात्र नैसर्गिक, अनुभवजन्य सविस्तर माहिती आहे. एखाद्या शेती खात्यातील अधिकाऱ्याला किंवा प्राध्यापकालाही रानपाला, झाडांची, वेलींची, पिकांची, फळांची माहिती नसेल एवढ्या माहितीचा साठा तिच्याकडे उपलब्ध आहे. ही माहिती तिला कामातूनच लहानापासूनच मिळाली. पानाफुलांचा, वेलवेलीचा, भाजीपाला आणि बियांचा संसार हे तिचे खरे विद्यापीठ. दर वर्षी पावसाळ्याच्या आधी आमचं घर बीजांचं गाठोडं बनतं. घरातल्या वाळक्या ओसरीवर, कुठे बांबूच्या टोपलीत, कुठे जुन्या साड्यांच्या गाठीमध्ये – वेगवेगळ्या बीजांचं संकलन ठेवलेलं असतं. वाळलेल्या वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, शेगड्या, वांगं, टमाटर, चुका, शेपू – कितीतरी प्रकार. गावकऱ्यांच्या बायका येऊन “वहिनी, तुमच्याकडं बी मिळेल का?” असं विचारत...

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

Image
व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत            माझ्या बी.एस्सी.च्या वर्गातला एक शांत, मितभाषी मुलगा – अमोल राऊत. वर्गात फारसं बोलणं नाही, न दाखवणारी धडपड, पण मनामध्ये ध्येयाच्या दिशेने सतत चाललेला प्रवास. आज त्याच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं, की खरंच हा पठ्ठ्या किती मोठा धाडसी निर्णय घेऊ शकतो याची जाणीव होते. १९८५ मध्ये त्याच्या वडिलांनी बीड शहरात “अंबिका भेळ” नावाचा एक छोटासा गाडा सुरू केला होता. साधा गाडा, साधी भेळ-पाणीपुरी, पण त्यात मेहनत, चव आणि प्रामाणिकपणा होता. त्या गाड्याने राऊत कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला, पण मोठ्या प्रमाणावर विस्तार होणं तसं शक्य नव्हतं. दरम्यान अमोलच्या शैक्षणिक वाटचालीत त्याला बँकेत कायम नोकरी मिळाली. अनेकांसाठी हे स्वप्नवत होतं – खात्रीशीर पगार, सुरक्षित भविष्य आणि समाजात मान. पण अमोलच्या मनात मात्र वेगळंच दडलेलं होतं. रोजच्या ऑफिसच्या टेबलावर बसताना त्याला जाणवायचं – “ही माझी खरी वाट नाही.” आणि मग एक दिवस त्याने ठरवलं. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील याचा विचार न करता त्याने बँकेची क...

स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण

Image
स्व. माजी खासदार अंकुशराव टोपे साहेब – एक आठवण           “शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात २००९ साली झाली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाटाकळी येथे माझी पहिली नेमणूक झाली. त्या वेळेस आम्ही सर्व तरुण शिक्षक सामाजिक कामाची उर्मी घेऊन उभे होतो. शिक्षकांची वेगवेगळी संघटना होत्या, पण आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या संघटनेतून काम करण्याचा निश्चय केला. शनिवार-रविवार सुट्टीत, वेळ मिळेल तसा आम्ही शिक्षकांचे प्रश्न, सन्मान सोहळे, अधिवेशने आयोजित करायचो. मी स्वतः फक्त एक साधा सभासद होतो, पण प्रत्येक कार्यक्रमात मनापासून सहभागी होत असे. आमच्यात सोपान पाष्टे सर, शंकर बोबडे सर, शशिकांत कावळे सर, हरी भोसले सर, विनोद आरसूळ सर, लक्ष्मण नेव्हल सर, अरुण राऊत सर यांच्यासह अनेक मंडळी होती. सगळे एकत्र येऊन काम करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवायची.           तारीख २० डिसेंबर २०१४. त्या वेळेस राजेश भैय्या टोपे आमदार व माजी मंत्री होते. आम्ही तरुण शिक्षकांनी कॅलेंडर तयार करून छापलं होतं. ...

सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"

Image
 ◆●अभियंता दिन विशेष●◆ "सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदुळकर…!"      दि.१५ सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आज २१ वे शतक असून त्याला विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणतो.  आज ठीक ठिकाणी विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, आयआयटी, तंत्रज्ञान विद्यापीठे उपलब्ध आहेत. हजारो अभियान सुद्धा उपलब्ध आहेत. शिवरायांच्या काळात अशा पद्धतीच्या शिक्षण किंवा इंजिनिअरिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. स्थापत्य कलेची आजच्याप्रमाणे आधुनिक व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये बांधकाम विभाग संभाळणारे बेलदार किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ असायचे. शिवरायांना रायगड ही राजधानी चांगली घडवायची होती. रायगडावर पूर्वी एक अर्धवट अवस्थेतील किल्ला होता. रायगडाचा डोंगर नुसता डोंगर नव्हता. तो स्वराज्याची राजधानी होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच विचार होता-“हा गड असा उभा राहिला पाहिजे की स्वराज्याचे वैभव आणि सामर्थ्य शत्रूलाही थरथरवेल.” हा स्वप्नसाकार करण्याची जबाबदारी महाराजांनी एका साध्या पण विलक्षण कर्तृत्ववान माणसावर सोपवली-हिरोजी इंदुळकर. हिरोजी हे  केवळ एक बांधकाम प्र...

शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी

Image
शेतकऱ्याच्या मुलाची केंद्र सरकारच्या वकीलपदाला गवसणी ॲड.नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून निवड ◆श्रीकृष्ण उबाळे बीड :  अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र  ॲड . नारायण कोंडीबा सिरसट यांची भारत सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात अभिमानाची लाट पसरली आहे. पुढील तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. मुळगाव वडगाव (कळसंबर), ता. बीड येथील सिरसट कुटुंबीयांची उपजीविका शेतीवर अवलंबून होती. आई-वडील शेतात राबून कुटुंब चालवत होते. अशा सामान्य शेतकरी घरातून आलेल्या नारायण यांनी बालपणापासूनच संघर्षाचा सामना करत शिक्षणाची कास धरली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण वडगाव हायस्कूल व नूतन कुंदकेश्वर विद्यामंदिर, कळसंबर येथे पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे घेतले. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बीए पदवी संपादन केली. कायद्याचे शिक्ष...

बचक

Image
                    ◆●बचक●◆            अजून अंधार पडला नव्हता. साडेसहा वाजले असतील. आभाळात थोडा केशरी रंग पसरला होता, आणि दिव्यांची लखलख सुरू झाली होती. मी बीड शहरातल्या पालवन चौकाच्या भाजी मंडईत गेलो. कोरोना लागल्यानंतर ही मंडई तिथं बसू लागली. रांगेनं शेतकरी आपापल्या टोपल्या, पोती, गाडी घेऊन बसलेले. कुणाच्या टोपलीत टवटवीत वांगी, कुणाच्या गाठीत मिरच्या, कुणाच्या ढिगात भोपळा… सगळीकडे ताज्या भाज्यांचा वास. मी चालता चालता भाजी बघत होतो. एका कोपऱ्यात एक शेतकरी दादा बसले होते, गव्हाळ रंग, डोक्यावर जुनं टॉवेल, आणि पायात चप्पल. त्यांच्या टोपलीत ताज्या-ताज्या मुगाच्या शेंगा होत्या. शेंगांचा हिरवा रंगच असा होता की पाहताच हात पुढं जाईल. मला त्या खूप आवडतात, म्हणून मी भाव विचारला. शेतकरी दादा म्हणाले,  "पन्नास रुपयाला अर्धा किलो, तीस रुपयाला पावशेर."  मी होकार देणार इतक्यात माझ्या अगोदर एक बऱ्यापैकी देखणा ग्राहक त्यांच्याकडं उभा होता. कपड्यांवरून आणि वागण्यावरून तो चांगल्या घरातला, कदाचित नोकरी कर...