दत्ता झोडगेची कामगिरी

एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये दत्ता झोडगेची सोनेरी कामगिरी

४०० मीटर आंतरराष्ट्रीय रिले स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक
बीड (प्रतिनिधी) :  चऱ्हाटा (ता. बीड ) या क्रीडामय भूमीचा सुपुत्र दत्ता झोडगे याने चेन्नई येथे दि. ०५ ते ०९  नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या २३व्या ‘एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ४×१०० मीटर रिलेस्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चऱ्हाटा गाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकला आहे. दत्ता झोडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेणारे, जिद्दी व शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकांची श्रीमंती मिळवली आहे. सदरील स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धा सुरू असून त्यामध्ये भारतासह आशियातील विविध देशांमधून दोन हजारापेक्षा जास्त ॲथलेटिक्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दत्ता झोडगे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून पदक मिळवलेले आहेत. आजपर्यंत त्याने राष्ट्रीय पातळीवर ७० पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होत तीन सुवर्ण, पाच रोप्य तसेच दहापेक्षा अधिक कास्यपदक मिळवलेले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्याने सहभाग नोंदवलेला आहे.  त्यांच्या या चिकाटी, मेहनत आणि देशप्रेमाने आज त्यांना सुवर्णयशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. चऱ्हाटा गाव हे खेळाडू घडवणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीतूनच विश्वविजेता नेमबाज नवनाथ फरताडे यांच्यासारख्या प्रतिभावंत खेळाडूंचा जन्म झाला आहे. गावातील अनेक युवकांनी नेमबाजी, ॲथलेटिक, धनुर्विद्या, कबड्डी, खो-खो अशा विविध खेळांमध्ये कौशल्य सिद्ध करून गावाचा  लौकिक राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वाढवला आहे. दत्ता झोडगे यांचे हे सुवर्ण यश केवळ वैयक्तिक विजय नाही, तर गाव, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावणारा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

दत्ता झोडगेची प्रतिक्रिया —

“ प्रत्येक स्पर्धेमागे असंख्य तासांचा सराव, अपयशानंतरचा आत्मविश्वास आणि मार्गदर्शकांनी दिलेली प्रेरणा दडलेली असते. चेन्नईमध्ये झालेल्या एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना मनात एकच विचार होता — ‘आपल्या देशाचा तिरंगा उंच फडकायला हवा. मी आज जे काही साध्य केलं आहे ते माझ्या पालकांचे आशीर्वाद, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांच्या शुभेच्छांमुळे शक्य झालं."

◆दत्ता झोडगे, आंतरराष्ट्रीय धावपटू.

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'