आपुलिया हिता जो असे जागता
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया ||१|| कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||२|| चांगल्या मार्गाचा अवलंब करून जो स्वतःचं हित कशात आहे हे जाणतो,आपल्या हितासाठी नेहमी जागरूक असतो तो जीवनात यशस्वी होतो.अशा मुलामुलींचे आईवडील खऱ्या अर्थाने धन्य असतात.मुलं अपयशी ठरली किंवा वाममार्गाला लागली तर सारेजण त्यांच्या आईवडिलांना नावे ठेवतात. मुलांच्या अगोदर त्यांच्या आईवडिलांना दूषणे दिली जातात. त्याचप्रमाणे मुलं यशस्वी झाली, संस्कारी निघाली,सन्मार्गाला लागली तर सर्वजण त्यांच्या आईवडिलांना नवाजतात.खरं म्हणजे मुलं घडवण्यामध्ये आईवडीलांचा खूप महत्वाचा वाटा असतो. 'शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी !' महत्त्वाचे संस्कार मुलामुलींना घरातूनच मिळत असतात.आई वडील संस्कारी असतील तर मुलंही संस्कारी निवडतात.बीज शुद्ध असेल तर त्यापासून येणारे झाड चांगले आणि फळ रसाळ ,गोड असतं. ज्या मुलामुलींना आपलं हित ,आपला फायदा कश...