पुणेरी पगडी


वात्रटिका

पुणेरी धोरण

साहित्य राहिले बाजूला
वेगळाच असा नाद आहे
मराठी साहित्य संमेलन
वाद एके वाद आहे

निवडणूक नसल्याने
फाईट कुठे तगडी आहे ?
अध्यक्षपदाच्या डोक्यावर
पुणेरी पगडी आहे

मराठी साहित्याचे असे
पुणेरी धोरण आहे
नाही कसे म्हणता येईल
साहित्यात राजकारण आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी