बदला बदली

वात्रटिका

बदलाबदली

जो नंदीबैल असतो
तो नेहमीच खास होतो
भ्रष्टाचारात येतो आडवा
त्यांचा नेहमी त्रास होतो

पारदर्शक प्रशासनासाठी
कोरडा केलेला घसा असतो
इमनदारांच्या बदलीवर
उमटलेला ठसा असतो

सत्य कोणालाच नको
हे पुन्हापुन्हा उघड होते
नियमाने चालणाऱ्यांचे
नेहमीच अवघड होते

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'