प्रश्न

वात्रटिका

प्रश्न

कोणतेही प्रश्न कधीच
मिटवायचे नसतात
राजकारण्यांना नेहमी
पेटवायचे असतात

राजकारणाचं पीक
जोमानं पिकवलं जातं
पेटत्या जाळावरच
बरंच शेकवलं जातं

माणुसकीचा धूर पाहून
सरडे दात विचकतात
गरीब बिचारी माणसं
भीतीने नेहमी दचकतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी