शिक्का

वात्रटिका

शिक्का

आरक्षणाच्या मुद्द्यावर
सोळा टक्की शिक्का
श्रेयबाजीच्या युद्धासाठी
जो तो झाला पक्का

टिकण्याचे काळच सांगेल
सांगायला आज मुद्दा झाला
निवडणुकीच्या कुस्तीसाठी
पॉवरबाज असा गुद्दा झाला

मुद्द्यांचे गुद्दे करून
थुका मात्र लावू नये
सारी केलेली धडपड
कोर्टात वाया जाऊ नये

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी