पोटाकडे पाय
वात्रटिका
पोटाकडे पाय
सत्य आणि न्यायाची
खरंच आयमाय आहे
स्वतःच्या पोटाकडे
स्वतःचा पाय आहे
सत्तेच्या जोरापुढे
कायदा ठरतो झूट
ज्याच्यावर अन्याय
त्याचीच होते लूट
जातीसाठी माती
आजही खाल्ली जाते
स्वकीयांच्या हिताची
बोली बोलली जाते
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment