रणकंदन

वात्रटिका

रणकंदन

समाजाच्या फायद्यापेक्षा
स्वहिताची चिंता आहे
आरक्षणाच्या प्रश्नावर
हाच मोठा गुंता आहे

कुणी भडकवतात
कुणी भडकवून घेतात
स्वतःचेच झेंडे स्वतःच
सारे फडकवून घेतात

जनासाठी कोणी नाही
हे प्रकाशा एवढे सत्य आहे
प्रश्न चिघळवणारे रणकंदन
नेत्यांकडून नित्य आहे

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी