तथ्य
वात्रटिका
तथ्य
भोकणारे भोकतात
खोकणारे खोकतात
कवडीची किंमत नाही
तेच गरळ ओकतात
उत्तराला प्रतिउत्तर देऊन
आपली उगाच जिरवू नये
त्यांच्यासारखे वागून
त्यांचाच पाढा गिरवू नये
नालायकांचा नालायकपणा
तो त्यांचा नित्य असणार
त्यांनी कितीही बोंबलले
त्यात थोडेच तथ्य असणार ?
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment