दिवे

वात्रटिका

दिवे

ज्यांनी प्रकाश द्यावा
तेच दिवे लावत आहेत
जी गोष्ट स्वप्नातही नको
तिथे सारे धावत आहेत

सूर्य असणाऱ्यांच्या मुखी
अंधाराचे गीत आहे
प्रकाश द्यायचा सोडून
नवीच अशी रीत आहे

अशा सूर्यापेक्षा आता
पणत्यांचा उजेड आहे
म्हणूनच अंधारालाही
पणत्यांचंच वेड आहे

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी