बगळ्यांची भावकी

वात्रटिका

बगळ्यांची भावकी

महाराष्ट्रात दुष्काळ असताना
नेत्यांचे प्रश्नच वेगळे आहेत
पदाच्या माशांवर टपलेले
इथून तिथून बगळे आहेत

त्यांचं ज्यांने भरत असतं
त्याच बाबींवर लक्ष असते
त्यांची सारी जातभावकी
स्वहितासाठी दक्ष असते

जनता जनार्धन खड्डयात
गुपचूप कुडकुडत आहे
बगळ्यांच्या अंगावर मात्र
ताजेपणा वाढत आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी