संन्यास

वात्रटिका

संन्यास

रामदेव बाबांनी डोळा
संन्यासाकडे मारला
म्हणे आपला देशच
संन्याशांनी तारला

साऱ्या जणांनी आता
एकच घ्यावा ध्यास
कल्याणासाठी म्हणे
घ्यायला हवा संन्यास

बाबांचा विचार त्यांच्या
आई बाबांचा असता
आजचा हा संन्यासी
कुठे दिसलाच नसता

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी