नामांतर
वात्रटिका
नामांतर
नामांतराची चर्चा
आली बघा रंगात
जो तो कसा बोलतोय
तावातावाच्या ढंगात
नावामधल्या बदलात
खरंच काही असतं का?
नावामधल्या हवेमध्ये
बरंच काही असतं का?
निवडणुकीच्या दह्यात
नामांतर तूप आहे
नामांतराचं भांडवल
सरड्यांचं खरं रूप आहे
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment