सत्तादास
वात्रटिका
सत्तादास
जिकडे असेल हवा
तिकडे मी उफणतो
ज्या विचाराने चालतो
त्याला मी दफणतो
लोकांना हसवणारी
शीघ्र कविता भारी
हसं करून घेण्याची
क्लुप्ती माझी न्यारी
स्टेटमेंट नेहमी देणारा
मी तसा खास आहे
आठवले का नाव माझे ?
मी सत्ता दास आहे...!!
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment