मांगल्याची नाळ

वात्रटिका

मांगल्याची नाळ

आकाश ते नवे होऊ
प्रकाशाचे दिवे होऊ
अंधाराला सारुन साऱ्या
प्रकाशाचे थवे होऊ

अंधाराच्या बुडाखाली
प्रकाशाचा जाळ होऊ
एका एका पणतीने
मांगल्याची नाळ होऊ

त्याग होऊ जाग होऊ
संगीताचा राग होऊ
थोडे थोडे जळून आपण
प्रकाशाचा भाग होऊ

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी