राजकीय फटाके
वात्रटिका
राजकीय फटाके
काहीजणांचे नेहमीच
सटाक्यावर सटाके आहेत
राजकारणातही वेगवेगळ्या
नमुन्याचे फटाके आहेत
कुणी टिकल्या तुडतुड्या
कुणी भुईनळे असतात
कुणाच्या लांबलांब लडी
भलतेच वळवळे असतात
कुणी फुलझाड्या,तोटे
कुणी धोकादायक असतात
कुणी कुणी फुसके असून
प्रत्यक्षात नायक असतात
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment