भडकाभडकी

वात्रटिका

भडकाभडकी

पाण्याचे मोल खरंच
कुणाला पटले आहे ?
जरी आज सारीकडे
पाणी पेटले आहे

पाणी म्हणजे जीवन
त्याचीच भडकाभडकी
जागोजागी पाण्याची
सारीच कडकाकडकी

भविष्यात तोच देश
खऱ्या अर्थाने सुखी
पाणी नियोजन मंत्र
ज्याच्या असेल मुखी

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'