Posts

गोकुळ अष्टमी

Image
गोकुळ अष्टमी            सन १९८५ किंवा १९८६ चा काळ. दोन्हीपैकी एक नक्की आहे. गोकुळ अष्टमीचा शुभमुहूर्त. गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण. अंगणात दहीहंडी फुटतेय, गावभर गोकुळाष्टमीचा उत्साह. आणि त्याच मंगलक्षणी एका मुलाचा जन्म झाला. दिसायला थोडा सावळा, पण अंगावरचे तेज मात्र लहानपणापासूनच वेगळे. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्याचं नाव “गोकुळ” ठेवावं, असं ठरलं. घरात पणजी ‘ताई’ आणि आजी ‘बाई’ यांनीच हे नाव सुचवलं. नामकरण विधी पार पडला. गावात गाजावाजा झाला. मात्र भावकीतल्या “दादा” नावाच्या माणसाला हे नाव रुचलं नाही. कारण त्याच्या स्वतःच्या मुलाचं नाव आधीच “गोकुळ” होतं. दादाला वाटलं, “आपल्या मुलाचं नाव दुसऱ्याने कसं काय ठेवलं?” तो संतापला. रागाच्या भरात घरी आला आणि संतापून बोलू लागला- “आरे, मुलाचं नाव दगड ठेवा, धोंडा ठेवा, कचरा ठेवा, चाबूक, बंदूक, पिस्तूल काय ठेवायचं ते ठेवा; पण माझ्या मुलाचं नाव तुमच्या मुलाला ठेवायचं नाही..!”  घरात क्षणभर शांतता पसरली. आजी, आई सगळ्या बुचकळ्यात पडल्या. आता काय करायचं? कोणतं नाव ठेवायचं? तेवढ्यात पणजी ताई पुढ...

बेलपान

Image
                         बेलपान     मी पाचवी-सहावीत शिकत होतो. घरची परिस्थिती साधीच. आमचं घर श्रीमंत नव्हतं, पण मेहनतीचं होतं. आई-वडील दिवसभर कष्ट करत, आणि त्यांना हातभार लावणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मी आणि माझ्या दोन बहिणी, आम्ही सगळ्या घरकामात, शेतकामात आणि जनावरांच्या देखभालीत मदत करायचो. सुट्टीचे दिवस असले की गाई-म्हशी, शेळ्या, कोंबड्या सांभाळणं, शेतात पाणी घालणं, तण काढणं… आणि दिवाळीनंतर कापसाचं हंगाम सुरू झाला की, गावात दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात किलोने कापूस येचायला जायचो. त्या कामातून मिळालेले पैसे मी हाक आई-वडिलांच्या हातावर ठेवायचो. त्यावेळी वाटायचं - "आपण लहान असलो तरी घराला थोडा आधार देऊ शकतो."             दरवर्षी श्रावण महिना आला की, माझ्यासाठी एक वेगळाच आनंद यायचा. श्रावणातील प्रत्येक सोमवारी लोक महादेवाच्या दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात जायचे. आमच्या गावात काही मोठी बेलाची झाडं होती. मी सकाळी लवकर उठून ती बेलपानं तोडायचो. ती पानं अगदी टवट...

संत तुकाराम महाराजांचे दोहे दोहा क्रमांक-२

Image
●◆तुकोबांचे शब्दधन◆● संत तुकाराम महाराजांचे दोहे             क्रमांक-२  "रामराम कहे रे मन। औरसुं नहीं काज । बहुत उतारे पार। आघे राख तुकाकी लाज ॥"       या दोह्यात संत तुकाराम महाराज आपल्याच मनाला एक प्रेमळ पण ठाम सल्ला देतायत. ते म्हणतात, "हे मना, तू फक्त रामाचं नामस्मरण करत जा, इतर गोष्टीत तुला काही घेणंदेणं नाही." म्हणजे काय, तर या जगात अनेक गोष्टी आकर्षक वाटतात – पैसा, माया, मान-सन्मान, हौस, नवलाई, परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत. या गोष्टी काही केल्या आपल्याला परमेश्वराच्या वाटेवर नेणार नाहीत. त्या फक्त मनाला गुंतवतात, आणि गोंधळ घालतात. तसेच अध्यात्मिक क्षेत्रात अनेक मार्ग आहेत. यामध्ये योग, यज्ञ, कर्मकांड, तंत्रमंत्र, बळी नवस तसेच इतर अनेक कठीण मार्ग आहेत. संत तुकाराम महाराज सांगतात की, "हे मना, तू इतर साधनांमध्ये, दांभिकपणात, आडमुठेपणात, आंगठीधारी बाबांच्या भूलथापांमध्ये नको गुंतूस. फक्त ‘रामराम’ म्हणायचं, तोच खरा साधनाचा रस्ता आहे. आणि तो सगळ्यात सोपा आहे." या दोह्यामध्ये ‘रामराम’ हा शब्द केवळ देवाचं नाव म्हणून न...

तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!

Image
"तोफा आणा... रणगाडे आणा..मला मारून टाका...!!" (होळ, ता. केज जि. बीड येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या धैर्याची कथा)           १९६७ च्या वर्षात, भारतात निवडणुकींचे वारे वाहू लागले होते. लोकशाहीच्या रुजवतीचा काळ होता तो. क्रांतिसिंह नाना पाटील, इंग्रजांना हादरवणारा, 'प्रतिसरकार' स्थापणारा, सत्यशोधक विचारांचा पुरस्कर्ता, आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर मैदानात उतरला होता. बीड जिल्हा, विशेषतः होळ गाव ता.केज हे काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जायचे. तिथे कम्युनिस्टांचा प्रवेश म्हणजे जणू खोलवर गेलेल्या मुळांमध्ये नवा विचार रोवण्याचा प्रयत्न. निवडणूक प्रचारासाठी नाना पाटील होळ येथे पोहोचले. गावाच्या वेशीवर काही लोक आधीच जमलेले. त्यांच्या हातात दगड, अंडी आणि राग होता. “हे काय? नानांवर दगडफेक? अंडीफेक?” कोणी म्हणाले, “कम्युनिस्टांचं काय काम आमच्या गावात?”  कोणी ओरडले, “हे काँग्रेसचं गाव आहे...!” हल्ला झाला. गर्दीतून दगड हवेत उडाले, काही अंडी नानांच्या अंगावर येऊन फुटली. पण नाना पाटील एक इंचही मागे हटले नाहीत. नानांन...

संत तुकाराम महाराजांचे दोहे-१

Image
      दोहा क्रमांक- १  "तुका बस्तर बिचारा काय करे रे । अंतर भगवा न होय। भीतर मैला कब मिटो रे । मरे उपर धोय ॥"            जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी या दोह्यामध्ये केवळ वस्त्राचे भगवेपण न धरता, मनाचे भगवेपण, अंतःकरणातील वैराग्य आणि त्यागाचे महत्व अधोरेखित केले आहे. त्यांनी यामधून असा संदेश दिला आहे की, वरवर भगवे कपडे परिधान करून कोणी साधू, संन्यासी, त्यागी बनत नाही. खरी साधना आणि वैराग्य हे अंतःकरणातून उत्पन्न व्हावे लागते. "तुका बस्तर बिचारा काय करे रे" या ओळीतून त्यांनी ‘बस्तर’ म्हणजे वस्त्र – कपडे – याबद्दल बोलताना एक करुण भाव व्यक्त केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने फक्त वरून भगवे वस्त्र घातले आणि त्याच्या अंतरात्म्यात वैराग्य नाही, त्यागाची भावना नाही, तर त्याच्यावर परिधान केलेले वस्त्र काही उपयोगाचे नाही. म्हणूनच ते भगवे वस्त्र ‘बिचारे’ ठरते, कारण ते फक्त एक ढोंग झाकून ठेवते. "अंतर भगवा न होय" – जर अंतःकरणात भगव्या रंगाचा अर्थ, म्हणजे त्याग, साधुता, आत्मशुद्धी, निर्लोभी वृत्ती, हे नसेल तर भगवे वस्त्र परिधान करून काही उ...

संत नामदेव महाराज अभंग

Image
●◆तुकोबांचे शब्दधन ◆● "भजन चालिले उपराटो ।  कोण जाणे खरे खोटे ।।   सजीवासी हाणी लाथा ।  निर्जीवापायी ठेवि माथा ।।   सजीव तुळशी तोडा ।  पूजा निर्जीव दगडा ।।   बेला करी मोडातोडी ।  शिवा लावोली रोकडी ।।   तोंड धरुनि मेंढा मारा ।  म्हणती सोमयाग करा ।।   सिंदूर माखुनिया थोडा ।  त्यासी भजति पोरे रांडा ।। अग्निहोत्राचा सुकाळ ।  कुशपिंपळाचा काळ ।।   मूर्तिकेची पूजा नागा ।  जित्यां नागा घेती अंग ।।   नामा म्हणे अवघे खोटे ।  एक हरिनाम गोमटे ।।" - संत शिरोमणी नामदेव महाराज  संत नामदेव महाराजांची अतिशय तीव्र, परखड आणि जागृती निर्माण करणारी अभंगरचना आहे. यात त्यांनी समाजातील आंधळ्या श्रद्धा, ढोंगी पूजा-पद्धती, रुढीपरंपरा, मूर्तिपूजेचा अंधानुकरण आणि खोट्या धार्मिक आडंबरांवर स्पष्ट आणि निर्भीड टीका केली आहे.  'सध्या जे भजन, पूजाअर्चा चालू आहे ती उलटी, खोटी चालले आहे. कोणाला काय समजतंय, खरं-खोटं ओळखणं कठीण झालंय. काहीजणांना खरंखोटं कळूनही ते उलटं वागत आहेत. खऱ्याचं खर...

लोकशाहीचा चिकन मटण उत्सव — विचार खा, शुद्ध मटन प्या

Image
📢 “लोकशाहीचा चिकन मटण उत्सव — विचार खा, शुद्ध मटन प्या!” 🍗🍖 लोकशाहीचा मूळ गाभा काय असतो? विचार, चळवळ, मूल्यं, संघर्ष, सत्तेवर प्रश्न, जनतेचा आवाज...पण आता हे सगळं किचन मध्ये बदललंय! आता मतासाठी योजना नाही, "मेनू" लागतो! कोणता वॉर्ड, कोणता विभाग हे बघून वाटप ठरतं – 5000 किलो चिकन, हजारो बकऱ्यांचे बळी आणि त्यावर "आखाडा पार्टी" चा भपका. हेच लोक आहेत ना, जे दोन दिवसांपूर्वीच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत होते…विठोबाच्या चरणी लीन होणारे, हरिनामाचा कळवळा दाखवणारे…आणि आता थेट  "मटन स्पेशल" घेऊन तुमच्या गल्लीपर्यंत पोहोचले आहेत. हे सगळं पाहून प्रश्न पडतो —ही लोकशाही आहे की लोकांची ‘शेळी-कोंबडी’ कापशाळा? 😂 “मत मागताना चिकन मटन वाटप!” आजकाल राजकारणातलं "विकास" हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे, आणि बाहेर फक्त चिकन मटण आणि आखाड्याचं वितरण सुरू आहे. माणसं रांगेत उभी आहेत — शुद्ध विचारासाठी नाही, तर बोनलेस चिकनसाठी...!  "लोकशाहीच्या पिंजऱ्यात विचार बंद…लोकांच्या डोक्यात फक्त बिर्याणीच्या हाडांचा आवाज....आज संपूर्ण राजकीय नेतृत्व हे ...