सत्तेचे कर'नाटक'

वात्रटिका

सत्तेचे कर'नाटक'

सध्या भाजपा म्हणजे
सत्तेजवळचे फाटक आहे
गोव्यानंतर सुरू झाले ते
सत्तेचे कर'नाटक' आहे

दुष्काळी लोकांचे
जसे स्थलांतर होते
सत्ता दुष्काळी नेत्यांचे
तसेच पक्षांतर होते

ज्याच्यावर आरोप केले
तेच आज पक्षात आहे
नमोगंगेत शुद्धीकरण
एवढेच सध्या लक्षात आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो-९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी