खरा गुरू

वात्रटिका

खरा गुरू

एक असतात गुरू
त्यांनी कान फुकला
शिष्य वळून म्हणतो
काय रे कानात थुकला

कानफुक्या मंत्राने
कुणी तरु शकत नाही
असल्या कानोळया गुरूने
कुणी उध्दरु शकत नाही

चांगला मार्ग सांगणारा
प्रत्येकजण गुरू असतो
त्याचं ऐकून बघा
तोच कल्पतरू असतो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी