लोकशाहीचे मरण

वात्रटिका

लोकशाहीचे मरण

नेताजी तिकडे पळतो
जिकडे असते धन
फोडाफोडीची संस्कृती
त्यामुळेच कॉमन

लोकांनी नाकारलं तरी
जबरदस्तीने मिळवता येतं
आपलं नसलेलं पाणी
आपल्या पिकात वळवता येतं

सत्तेच्या कर'नाटकाने'
कोणी कमकुवत ठरतेय
लोकशाहीच्या बंदुकीने
लोकशाहीच मरतेय.....!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा नवनवीन वात्रटिका.....!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी