संत नामदेव महाराज अभंग
●◆तुकोबांचे शब्दधन ◆● "भजन चालिले उपराटो । कोण जाणे खरे खोटे ।। सजीवासी हाणी लाथा । निर्जीवापायी ठेवि माथा ।। सजीव तुळशी तोडा । पूजा निर्जीव दगडा ।। बेला करी मोडातोडी । शिवा लावोली रोकडी ।। तोंड धरुनि मेंढा मारा । म्हणती सोमयाग करा ।। सिंदूर माखुनिया थोडा । त्यासी भजति पोरे रांडा ।। अग्निहोत्राचा सुकाळ । कुशपिंपळाचा काळ ।। मूर्तिकेची पूजा नागा । जित्यां नागा घेती अंग ।। नामा म्हणे अवघे खोटे । एक हरिनाम गोमटे ।।" - संत शिरोमणी नामदेव महाराज संत नामदेव महाराजांची अतिशय तीव्र, परखड आणि जागृती निर्माण करणारी अभंगरचना आहे. यात त्यांनी समाजातील आंधळ्या श्रद्धा, ढोंगी पूजा-पद्धती, रुढीपरंपरा, मूर्तिपूजेचा अंधानुकरण आणि खोट्या धार्मिक आडंबरांवर स्पष्ट आणि निर्भीड टीका केली आहे. 'सध्या जे भजन, पूजाअर्चा चालू आहे ती उलटी, खोटी चालले आहे. कोणाला काय समजतंय, खरं-खोटं ओळखणं कठीण झालंय. काहीजणांना खरंखोटं कळूनही ते उलटं वागत आहेत. खऱ्याचं खर...