गॉगल

गॉगल

घातला मी एकेदिवशी
भगवा भगवा गॉगल
हिंदूवरील अन्यायाने
झालो ना मी पागल

मग मी गॉगल घातला
हिरव्या हिरव्या ढंगाचा
इस्लामवरचा धोका
दिसला काळ्या रंगाचा

नष्ट होतोय की काय
बनलो मी पार खुळा
डोळ्यावर होता माझ्या
गॉगल चक्क निळा

बाकी अनेक रंगांची
बदलून पाहिली काच
प्रत्येकवेळी संकटांचे
पाढे दिसले पाच

रंग काढून बघायला
काच कधी पुसली नाही
मानवतेपुढची समस्या
मला अजून दिसली नाही

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी