गांधी हत्या रिटर्न

वात्रटिका

गांधी हत्या रिटर्न

जिवंतपणी मारला गांधी
तरी तो मेला नाही
किडक्या सडका दहशतवाद
अजूनही गेला नाही

पुतुळयाला माराल गोळ्या
मनामनाचं करताल काय ?
जिथे जिथे गांधी जीवंत
सांगा त्याला मारताल काय ?

शांतीच्या अंताने सांगा
सुख कोणाला भेटले आहे ?
बर्फाळलेले मनंसुद्धा
तुमच्या कृतीने पेटले आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'