ढाल
वात्रटिका
ढाल करू नका
दहशतवादी हल्ल्याने
रक्ताचा पूर आला
नेताजी तुमच्या फक्त
भाषणांचा सूर आला
सैनिकांच्या रक्तावर
भीक आता मागू नका
हात जोडून विनंती
नौटंकीने वागू नका
राजकीय वारासाठी
रक्ताची ढाल शोधत असाल
समजून घ्या राजकारण्यांनो
देशासाठी खड्डा खोदत असाल
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment