पत

वात्रटिका

सत्ताभोगाची पत

घटस्फोट घ्यायचा म्हणत
पाच कधी झाले कळलं नाही
रोज व्हायचा छळ तरी म्हणे
आम्ही भांडण खेळलं नाही

तुझं माझं जमलं नाही
सत्ताभोगाला दमलं नाही
अशातली ही गत आहे
तुम्हीच ठरवा राजेहो
तुमची काय पत आहे...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी