बल्ले बल्ले
वात्रटिका
बल्ले बल्ले
युतीसाठी रोज
मिळू लागले सल्ले
शिवसेनेचं आपलं
वेळेला बल्लेबल्ले
उंट पहाड के नीचे
अशी भाजपाची गत
कमी असून सुजलेली
शिवसेना पक्षाची पत
पाच वर्षांच्या फरपटीचा
हा जणू बदला आहे
उद्धवाच्या मनात जे
संजयउवाच वदला आहे
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment