रस आणि चिवट्या

वात्रटिका

रस आणि चिवट्या
-------------------------
ज्यांच्याकडे असतो
सत्तेचा गोड ऊस
त्यांच्याकडे कार्यकर्ते
असतात नेहमी खूष

गोड गोड रस
साहेबांच्या वाट्याला
चिवट्यांची आशा
नेहमीच बूटचाट्याला

इतकी खालची आशा
दया रे आता सोडून
स्वाभिमानी व्हा ना
सांगतो हात जोडून

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी