थुका

/वा/त्र/टि/का/

थुका
--------
हर एक माणूस
डोळे असून आंधळा
कान असून बहिरा
तोंड असून मुका आहे
म्हणूनच भामट्यांचा
देशालाच थुका आहे

थुका लावणारे सारे
आजकाल मुकुटमणी
आंधळे,मुके,बहिरे
अत्याचाराचे धनी

झोपेतून उठून साऱ्यांनी
थोडं तरी जागू या
जिवंत असल्यासारखे
थोडं तरी वागू या.....!!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'