हिंसेचे गीत
वात्रटिका
हिंसेचे गीत
भाषणातून फेकायचं
प्रत्यक्षात ठोकायचं
ही कसली रीत आहे?
अहिंसेच्या जयंतीला
हिंसेचे गीत आहे
महागाईच्या होरपळीत
भावाचा कुठे पत्ता आहे?
ते आवाज वाढवणारच
ज्यांच्याकडे सत्ता आहे
जय किसान समजायला
भाषण देऊन भागत नाही
सत्तेवर येणारा हरएक
खाल्लं अन्न जागत नाही
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment