लो पातळी
वात्रटिका
लो पातळी
विरोधी विचार मांडताना
कोण ओव्या शिकला ?
एकमेकांच्या तोंडावर
प्रत्येकजण शिव्या थुकला
ज्याचे त्याचे संस्कार
ज्याची त्याची संस्कृती
काही वाचळांच्या माथी
नेहमी शाब्दिक विकृती
आजचे राजकारण
शुद्ध 'कार्टून शो' आहे
शब्दांच्या वापराची
पातळीच लो आहे
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment