प्रश्नांचा तवा
वात्रटिका
प्रश्नांचा तवा
प्रश्न पघळावे लागतात
प्रश्न चघळावे लागतात
राजकारण करण्यासाठी
प्रश्न चिघळावे लागतात
उत्तर माहित असताना
कधी सोडवत नसतात
बऱ्या होणाऱ्या जखमेला
नव्याने सडवत असतात
प्रश्न धगधगता ठेवणं
हा राजकीय तवा असतो
आपल्या पोळ्या शेकायला
प्रत्येकाला हवा असतो
- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment