उत्सवप्रियता

वात्रटिका

उत्सवप्रियता

जे सत्य सांगतील
त्यांचे कधी पटणार नाही
कितीही मेले तरी
उत्सवप्रियता घटणार नाही

गर्दीच्या सर्दीमुळे
स्वतःच पाजी आहोत
मोठेपणा मिरवण्यात
मरायलाही राजी आहोत

प्रकाशाच्या दिव्याला
हातानेच मालवू नका
अनमोल या जीवाला
फुकट असे घालवू नका

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी