वेशांतर

वात्रटिका

वेशांतर

नकला करण्याची खुबी
अत्यंत सोपी असते
जाईन तिथल्यासारखी
डोक्यावर टोपी असते

वेशांतर आणि देशांतर
हेच ज्यांना प्यारे आहेत
कोण म्हणतो राजकारणी
दुसऱ्यांपेक्षा न्यारे आहेत ?

नकला बघण्या बघण्यात
सारेजण गुंतले आहेत
महागाईच्या भडक्यात
सामान्य कुंथले आहेत

- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'