आठवण

वात्रटिका

आठवण

निवडणुकीच्या तोंडावर
एकच असते काम रे
पाच वर्षे विसर पडला
आता आठवला राम रे

मेळावे आणि समारंभ
झाले राजनीतीचे अड्डे
गरिबांच्या पोटामधले
का दिसेना गेलेत खड्डे?

जनभावनेच्या इंधनाचा
केला जातो भडका
मतदार आपला मारतो
खडकावरती धडका

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'