ज्योत
वात्रटिका
ज्योत
स्वतःचा मेंदू गंजवून
देवीसाठी पळतो आहे
आपल्या आतील ज्योतीचा
अर्थ कुणाला कळतो आहे
बियरच्या मापावर
अंतराचा काप असतो
घरामध्ये अस्वस्थ
आई आणि बाप असतो
देवीच्या नावे आंधळेपणा
देवीला लागत नाही
डोळसपणाचा व्यवहार
पळणारा का वागत नाही ?
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment