बहुरंगेपणा
वात्रटिका
बहुरंगेपणा
नवरात्रिच्या दिवसात
रंगांचे फॅड असतात
बहुरंगे होण्यासाठी
बरेचजण मॅड असतात
आमच्या मॅडपणामुळे
धंदा मात्र जोमात आहे
बिनडोकपणामुळे सारी
बुद्धी गेली कोमात आहे
शिकून सवरून आम्ही
असेच जर हुकणार
बुद्धीचा वापर करायला
कधी आम्ही शिकणार ?
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment