बाहेरचे कारण

वात्रटिका

बाहेरचे कारण

म्हाताऱ्याही आजकाल
काटक राहू लागल्या
आपल्या म्हातारबांवर
जातीने लक्ष देऊ लागल्या

अचानक असं वागणं
कळण्याबाहेरचं होतं
कारण घरचं नव्हतं
तर तेही बाहेरचं होतं

म्हणे आपला ठोकळा
वागण्यात खोटा नको
आपल्या म्हातारबाचा
उगाच अनुप जलोटा नको

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी