वंदे मातरम

वात्रटिका

वंदे मातरम

हातात हात येताच
सुरात मिसळला सूर
वंदे मातरम विरोधी
करू लागले कुरकुर

असल्या या विरोधाचा
सगळीकडे तोटा होतो
कुणाला गुदगुल्या होतात
स्वतःचा फुपाटा होतो

जनभावनेच्या विरोधी
केलेली ही तुणतुण आहे
वाण जरी लागला नाही
लागलेला तो गुण आहे

- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी