देशी विदेशी

वात्रटिका

देशी-विदेशी

स्वदेशीच्या नशेमध्ये
बाबाजी जिरवतात
विदेशी कंपन्यांसाठी
साहेब मिरवतात

स्वदेशी विदेशी प्रेम
आज फळफळत आहे
आपल्या पदरात काय
हे कोणाला कळत आहे?

आपापल्या उद्योगात
जो तो निवांत मग्न आहे
जे जे स्वप्न रंगवले
ते मात्र भग्न आहे...!!

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी