निवडणुका
वात्रटिका
निवडणुका
निवडणुका म्हणजे
माणगुटीवरचं भूत आहे
मेळावे ,भाषणांचा
फेसासह उत आहे
त्याच घोषणा तेच दावे
नवा फक्त ताव असतो
ज्यांच्याकडे सत्ता आहे
त्यांना भलता भाव असतो
कार्यकर्ते उत्साही
त्यांना मस्त खेळवले जाते
पैशाच्या जोरावरच
समोरच्याला लोळवले जाते
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment