पुतळ्यांची उंची
वात्रटिका
पुतळ्यांची उंची
पुतळे स्मारक मंदिराच्या
चर्चा सुरू झाल्या वाटतं
अरे विसरूनच गेलो
निवडणुका आल्या वाटतं
पुतळ्यांच्या उंचीसाठी
जगात प्रतिस्पर्धी आहोत
भावनेच्या मोठेपणाने
उगाचच दर्दी आहोत
पुतळ्यांपेक्षा मोलाचा
त्यांचा विचार हवा आहे
विचारांपेक्षा मोलाचा
त्यावर आचार हवा आहे
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment