पुण्याई
वात्रटिका
पुण्याई
कुणाला काकांची असते
कुणाला बापांची असते
कुणाला तर पुण्याई
चक्क थापांची असते
कुणाला आज्याची असते
कुणाला भावाची असते
कुणाला तर पुण्याई
चक्क आडनावाची असते
कुणाला जातीची असते
कुणाला नात्याची असते
कुणाला तर पुण्याई
पेपरच्या पात्याची असते
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment