Posts

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती

Image
◾जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली हनुमान स्तुती ◾               हनुमान हे रामायणातील एक प्रमुख नाव असून ते रामाचे महान भक्त मानले जातात. त्यांच्या जन्मबाबत अनेक मतांतरे आहेत. महाराष्ट्रात त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांचा जन्म अंजनी नावाच्या वानरीच्या पोटी अंजनेरी जिल्हा नाशिक येथे झाल्याचे मानतात. त्यांच्या वडिलांचे नाव केसरी होते.  हनुमान खूप ताकदवान महाबली होते. त्यांना भूक लागली, फळ समजून सूर्याला खायला निघाले. इंद्राने वज्र फेकून मारले ते हनुवटीला लागले. त्यावरून त्यांचे नाव हनुमान पडले. राम वनवासात असताना त्यांची व हनुमंताची भेट झाली. रावणाने पळवून नेलेल्या सीतामातेचा शोध त्यांनी लावला, रावणची लंका जाळली. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला. सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून हनुमंतरायाचा उल्लेख केला जातो. त्यांना मारुती, हनुमान, पवनसुत, अंजनेय, बजरंगबली, वायुपुत्र,केसरीनंदन असे विविध नाव आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महार...

गाडगेबाबा थोर संत

Image
◾संत गाडगेबाबांविषयी गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर◾             महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत गाडगे महाराज यांचं स्थान अत्यंत उंच आहे. अशा थोर संतपुरुषांना “नास्तिक” ठरवण्याचा प्रयत्न माधव घुले नावाच्या तथाकथित बुवाकडून जाणीवपूर्व होत असेल, तर तो केवळ अज्ञानाचा नाही तर वारकरी परंपरेचा अपमान आहे. गाडगेबाबा हे नास्तिक नव्हते ते अंधश्रद्धाविरोधी होते. त्यांनी देव नाकारला नाही, पण देवाच्या नावावर चालणाऱ्या खोट्या आडंबराला विरोध केला. त्यांच्या कीर्तनाची सुरुवात “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या नामस्मरणाने व्हायची आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांचा आधार घेतल्याशिवाय ते कधी बोलले नाहीत. मग अशा संताला नास्तिक म्हणणं हा कोणता अभ्यास, असा सवाल प्रत्येक वारकऱ्याच्या मनात निर्माण होतो. वारकरी संप्रदायाचा गाभा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आणि हे तिन्ही गुण गाडगेबाबांच्या जीवनात ओसंडून वाहत होते. म्हणूनच अनेक वारकरी त्यांना तुकोबांचा अवतार मानतात. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू येथे वारकऱ्यांसाठी धर्मशाळा, आश्र...

बलिदानाचा अर्थ

Image
◆बलिदानाचा अर्थ◆ रोज नव्या भोंदू बुवाचा चमत्कार इथे घडतोय साऱ्या व्यवस्थेचा मेंदू यामुळेच तर सडतोय कधी येईल विवेकाला जाग ? हा प्रश्न मनाला छळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ज्यांनी धर्म शिकवायचा त्यांची आज शरम वाटते ज्यांच्यामुळे शांती यावी त्यांची मनात भीती दाटते त्यागाचा मुकुटमणी व्हावा तो नको तिथे लोळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? सत्य असत्य पाहण्याची कुठे भक्तांना शुद्ध असते ? आमच्याच बांधवांशी आमचे खुले युद्ध असते सारा देश अभक्तांनी इथून तिथून जळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? तुकारामांच्या भाषेत बुडणारे डोळ्यांनी पाहवत नाही उगाच शांत बसावे हे मनाला राहवत नाही तुमच्या मार्गाने जाणाऱ्यांना इथला अधर्म गिळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? लोकांना विचाराने येणार नाही निदान दुष्कृत्यांने जाग येईल आपण किती भाबडे आहोत याचाही कधी राग येईल नाहीतर कुत्रं पीठ खातंय आंधळा आपला दळतोय डॉक्टर तुमच्या बलिदानाचा अर्थ कुणाला कळतोय ? ◆श्रीकृष्ण उबाळे,बीड ◆मो.9405344642 #बलिदानाचा_अर्थ #नरेंद्रदाभोळकर #अंधश्रद्धा_निर्मूलन ...

एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष

Image
◾एक गॅसची टाकी आणि चार तासांचा संघर्ष◾           बुधवारी आमच्या घरचा गॅस संपला आणि घरात स्वयंपाक थांबण्याची वेळ आली. आजपर्यंत आम्ही गॅस एजन्सीच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षावाल्याला फोन करून गॅस मागवत होतो. दोन तासात गॅस घरी येत असे. पण यावेळी फोन केला तर त्याने सांगितले की आता होम डिलिव्हरी बंद केली आहे, तुम्ही बुकिंग करून दोन दिवसांनी एजन्सीवरून गॅस घ्या. त्याप्रमाणे मी लगेच आयव्हीआरवर फोन करून गॅस बुकिंग केली. बुकिंग नंबरही मिळाला, पण त्याचा मेसेज काही आला नाही. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मी गॅस एजन्सीवर गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी ओटीपी दाखवा असे सांगितले. मी आयव्हीआरवर मिळालेला बुकिंग नंबर दाखवला, पण त्यांनी सरळ सांगितले की मेसेज असेल तरच गॅस मिळेल. माझी समस्या समजून घेण्याऐवजी त्यांनी एक प्रकारे मला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका व्यक्तीला बोलावून माझी माहिती तपासायला सांगितले. त्या व्यक्तीने मोबाईल ऍपवर माझे केवायसी तपासले. सर्व काही व्यवस्थित होते. मग त्याने माझ्याच मोबाईलवरून पुन्हा बुकिंग केली. त्यानंतर जो मेसेज आला तो पाहून ...

संत तुकाराम महाराज जन्म विशेष

Image
◾अभंग तुकाराम-अखंड तुकाराम ◾              वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी, तारखेनुसार २ फेब्रुवारी १६०८ रोजी महाराष्ट्राच्या भूमीत एका विलक्षण आत्म्याचा जन्म झाला, तो म्हणजे संत तुकाराम महाराज. त्यांच्या जन्मतारखेबाबत मतभेद असले तरी त्यांच्या विचारांबाबत, त्यांच्या संतत्वाबाबत आणि त्यांच्या समाजपरिवर्तनाबाबत कुठलाही मतभेद नाही, कारण तुकाराम महाराज हे केवळ एका काळापुरते मर्यादित न राहता सर्व काळासाठी मार्गदर्शक ठरलेले महापुरुष आहेत. बोल्होबा व कणकई यांच्या पोटी जन्मलेले तुकाराम महाराज लहान वयातच आयुष्याच्या कठोरतेला सामोरे गेले. वडिलांचा मृत्यू, आईचा मृत्यू, मोठ्या भावाचे घरातून निघून जाणे, भावाच्या पत्नीचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलाचा व पहिल्या पत्नीचा मृत्यू अशा भीषण दुःखांचा मारा त्यांच्या आयुष्यावर झाला, परंतु या दुःखांनी त्यांना मोडले नाही, उलट त्यांचे मन अधिक अंतर्मुख, अधिक संवेदनशील आणि अधिक भक्तीमय बनले. लहान वयातच त्यांच्या खांद्यावर संसाराचा मोठा भार पडला, व्यापाराची जबाबदारी, कर्जाचे ओझे आणि कुटुंबाची काळजी या सगळ्यांत अडकून असतानाही त...

मन जिंकलं तर जग जिंकता येत

Image
         ❤️अनुभव आले अंगा❤️ ◾मन जिंकलं तर जग जिंकता येत◾          कोरोनाचं लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालं होतं. अनेक महिने घरात बंदिस्त असलेलं मन मोकळ्या श्वासासाठी आसुसलेलं होतं. शरीर बाहेर पडायला तयार होतं. अशा वेळी बीडमधील आमच्या देवराई ग्रुपमध्ये एक निर्णय झाला- 'यावेळी वासोटा किल्ला सर करायचा...!' वासोटा… सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला अती दुर्गम वनदुर्ग. केवळ ट्रेकिंग नव्हे, तर इतिहासाशी थेट संवाद साधणारा अनुभव. निघायच्या आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामी पोहोचलो. पहाटे लवकर उठून तयारी केली आणि शिवाजी सागर जलाशयातून बोटीत बसलो. कोयना धरणाच्या अथांग पाण्यावरून जाताना सभोवतालचं वातावरण विलक्षण गंभीर वाटत होतं. डोंगररांगा, पाण्यावर पडलेली सकाळची कोवळी ऊन आणि शांततेत मिसळलेला इतिहास.....मन नकळत शिवकाळात हरवून गेलं. वनविभागाच्या चेक पॉईंटवर पोहोचलो. प्लास्टिक बाटल्या, सामान यांची काटेकोर तपासणी झाली. कारण हे जंगल म्हणजे निसर्गाचं पवित्र मंदिर आहे. तिथून पुढे सुरू झाला खरा कसोटीचा प्रवास. जंगलातून वासोट्या...

गरज सरोआणि वैद्य मरो

Image
◾गरज सरो आणि वैद्य मरो ◾            एखाद्या कादंबरीत असावी अशी घटना. चार वर्षांपूर्वी बीड शहरात घडलेली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं, उपकार विसरण्याचं आणि गरज संपली की माणसं कशी बदलतात याचं जिवंत उदाहरण. बीड येथील एका सामाजिक संस्थेने मोठ्या कष्टानं वृद्धाश्रम सुरू केलं होतं. फार मोठ नाही, पण स्वच्छ, माणुसकी जपणारं, प्रेमाने चालणारं. तेथे येणारे वृद्ध म्हणजे आयुष्याने थकलेले, नात्यांनी फसवलेले, संसाराने झिजवलेले. अशाच एका दुपारी आश्रमाच्या दारात एक वृद्ध जोडपं उभं होतं. साधी कपडे, अंगावर थकव्याची झाक, डोळ्यांत भीती आणि आसरा द्यावा ही अपेक्षा यांचा विचित्र संगम. वय साधारण साठच्या आसपास. त्यांना मुलबाळ नव्हते. आयुष्यभर सरकारी सेवेत काम केलेलं. पती मंडळ अधिकारी होते. पण काही कारणाने त्यांची सरकारी सेवेतून बडतर्फी झाली होती. ती अन्यायकारक असल्याचं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. केस चालू होती. पण केस चालू असताना नोकरी गेली, पगार थांबला, आणि आयुष्याची गाडी रुळावरून घसरली.नोकरी हेच त्यांचं जगण्याचं एकमेव साधन होतं. सुरुवा...

गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन

Image
◾गाडगेबाबांचे आमच्या गावातील कीर्तन◾          खूप वर्षांपूर्वीचा तो दिवस…माझे आजोबा रामराव माधवराव उबाळे सांगायचे, तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षे होते. पाच वर्षांपूर्वी वयाच्या शंभरव्या वर्षी त्यांचे निधन झाले. चऱ्हाटा ता. बीड गाव तसं लहानसं, साधंसुधं. सर्व जाती धर्माचे लोक गावात राहायचे. कच्च्या गल्ल्या, विहिरीचं पाणी, लाईट नाही, संध्याकाळ झाली की टेंभ्यांचा उजेड. आजोबांच्या आठवणीतला तो प्रसंग मात्र आजही जिवंत होता. वयाच्या एकशेएक वर्षांपर्यंत त्यांनी तो तितक्याच जिवंतपणे सांगितला. त्या दिवशी सकाळी सकाळी गावाच्या वेशीवरून एक विचित्र माणूस चालत आला. पांढरीशुभ्र दाढी, उंच, रांगडा देह; पण अंगावर फाटक्या चिंध्या. डोक्यावर कापड गुंडाळलेलं आणि त्यावर मडक. लोकांनी पहिल्यांदा पाहिलं आणि मनात आलं हा कुठला फकीर ? कुठून आला असेल? तो माणूस थेट गल्लीमध्ये गेला. खेळत असलेल्या बारक्या पोरांना हाक मारली.“अरे पोरांनो, या रे… काम आहे.” पोरं कुतूहलानं गोळा झाली. त्यानं कुठलीही कथा सांगितली नाही, उपदेश केला नाही. हातात खराटा घेतला आणि म्हणाला, “चला, गाव झाडून काढूया...

उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले

Image
◾उपेक्षित महानायिका सावित्रीबाई फुले◾              आपले महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य म्हणून गणले जाते. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात शिक्षण खासकरून स्त्री शिक्षण जास्त प्रमाणात आहे. अनेक सामाजिक बदलांचे नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला तोड नाही. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी यशस्वीपणे प्रवेश करून पुरुषांची मक्तेदारी कमी केली आहे. कुठल्याही शाळा-महाविद्यालय, विद्यापीठ, बोर्ड किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये मुलींनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून आम्ही कुठेच कमी नाही यावर मोहर उमटवली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, आमदारकी खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री एवढेच काय भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत गवसणी घालण्याचा मान स्त्रीला प्राप्त झाला. या सर्वांसाठी ज्या देवीने पाया तयार करून ठेवला, स्वतःला संपवून घेतलं त्या सावित्रीबाई फुले यांच्या विषयी किती जणांच्या खासकरून जणींच्या मनात भाव आहे ? त्यांच्याविषयीची सामान्य जाणीव किती आया-बायांना आहे ? हा प्रश्न ...

अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे

Image
अस्पृश्यता निर्मूलणासाठी सर्वस्व अर्पण करणारा 'संत' विठ्ठल रामजी शिंदे           महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षित, बहिष्कृत आणि दलित घटकांच्या उन्नतीसाठी वेचले. समाजसुधारणेच्या मार्गावर चालताना त्यांनी स्वतःच्या सुख, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेचा विचार न करता मानवी समतेचा ध्यास अखेरपर्यंत जपला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी संस्थान येथे एका खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजीबाबा आणि आई यमुनाबाई. घराणे पूर्वी श्रीमंत होते; मात्र कालांतराने ही श्रीमंती ओसरली आणि गरिबीने घरात प्रवेश केला. वडील रामजीबाबा काही काळ संस्थानात शिक्षक व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी असल्याने घरात भक्ती, सात्त्विकता आणि साधेपणाचे वातावरण होते. आई यमुनाबाई सात्त्विक वृत्तीची असून घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते. याच वातावरणामुळे लहानपणापासूनच विठ्ठलरामजींच्या मनात माण...

साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक

Image
साने गुरुजी : माणुसकीचा दिवा पेटवणारा संत शिक्षक           महाराष्ट्राच्या मातीला जर कुणी माणुसकीचा सुगंध दिला असेल, तर तो साने गुरुजींनी दिला. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव. २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. समुद्रकिनाऱ्याजवळचं ते गाव, साधी माणसं आणि कष्टकरी जीवन याच वातावरणात गुरुजी वाढले. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडिलांची नोकरी तुटपुंजी, आईचा संसाराचा ओढा मोठा. तरीही त्या घरात प्रेमाची, संस्कारांची आणि सत्याची कमी कधीच नव्हती. आईकडूनच गुरुजींना माणसावर प्रेम करायचं, दुःख पाहून गप्प बसायचं नाही, हे शिकायला मिळालं. बालपणापासूनच गुरुजींचं मन थोडं वेगळं होतं. इतर मुलं खेळात रमलेली असताना हा पोरगा पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. अंगात साधे कपडे, पायात चप्पल नाही, पण डोळ्यांत मात्र मोठी स्वप्नं होती. शिक्षण घेत घेत ते पुणे, मुंबईपर्यंत पोहोचले. अभ्यासात हुशार असल्यामुळे नंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पण गुरुजींसाठी शिक्षक म्हणजे फक्त शाळेत तास घ्यायचा धंदा नव्हता. विद्यार्थ्यांच्य...

सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!

Image
सगळे बिबटे मारून टाकले पाहिजेत.....!!                 सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या बीडमधील आजूबाजूच्या तालुक्यांत आणि गावोगावी एकच चर्चा चालू आहे की बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्या गावात शिरला, शेतात दिसतोय, माणसांवर हल्ले होतातायत. हे ऐकल्यावर भीती वाटणं साहजिक आहे, पण थोडं शांतपणे विचार केला तर कळतं की खरंतर दहशत बिबट्यांची नाही, दहशत आपल्या गैरसमजांची आहे. बिबट्या हा काही आज कालच जंगलातून बाहेर पडलेला प्राणी नाही, तो इथेच होता, आपल्या आजोबांच्या काळातही होता, फरक एवढाच आहे की तेव्हा जंगलं, झुडपं, डोंगररांगा होत्या, आज तिथं रस्ते झाले, कारखाने झाले, वसाहती वाढल्या, उसाची शेती सगळीकडं पसरली आणि बिबट्याचा आसरा कमी झाला. जिथं लपायला उस आहे, पाणी आहे, मोकाट कुत्रे आहेत, डुक्कर आहेत, शेळ्या, मेंढ्या आहेत, तिथं बिबट्या येणारच, त्याला गावात यायची हौस नसते, त्याला फक्त पोटाची आणि जगायची गरज असते. लोक म्हणतात बिबट्यांची संख्या फार वाढली, पण खरं सांगायचं तर बिबट्यांपेक्षा माणसांची संख्या आणि आपला निसर्गातला हस...

दत्ता झोडगेची कामगिरी

Image
एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये दत्ता झोडगेची सोनेरी कामगिरी ४०० मीटर आंतरराष्ट्रीय रिले स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक बीड (प्रतिनिधी) :  चऱ्हाटा (ता. बीड ) या क्रीडामय भूमीचा सुपुत्र दत्ता झोडगे याने चेन्नई येथे दि. ०५ ते ०९  नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या २३व्या ‘एशिया मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ४×१०० मीटर रिलेस्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चऱ्हाटा गाव, बीड जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकला आहे. दत्ता झोडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेणारे, जिद्दी व शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदकांची श्रीमंती मिळवली आहे. सदरील स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धा सुरू असून त्यामध्ये भारतासह आशियातील विविध देशांमधून दोन हजारापेक्षा जास्त ॲथलेटिक्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला. दत्ता झोडगे यांनी यापूर्वीही विविध राष्ट्री...

खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!

Image
खरोखर 'तुकाराम' मुंढेंचे निलंबन नव्हे बडतर्फी करायला हवी...!!               आजही आपल्या समाजात सत्य बोलणारा, नियम पाळणारा आणि सरळ चालणारा माणूस ‘समस्या’ समजला जातो. इतिहासात संत तुकाराम महाराजांना तत्कालीन व्यवस्थेने सहन केले नाही, त्यांच्या अभंगांनी ढोंगीपणाचा मुखवटा फाडला म्हणून त्यांना विरोध झाला. आजचा काळ बदलला… पण ढोंगीपणा, भ्रष्टाचार, पूरकतेची मानसिकता अजिबात बदलली नाही. तुकाराम म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यासाठी जगणे, सत्यासाठी उभे राहणे, सत्यासाठी झगडणे हीच त्यांची शिकवण. ते म्हणालेच आहेत : “सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे…” सत्यावर असंख्य अभंग....कारण त्यांना माहिती होते की मनुष्याला सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सत्य जगणे.          आज या सत्यनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेणारा एक अधिकारी—तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईचे राजकारण सुरू आहे. कारण? ते नियम पाळतात. भ्रष्टाचार सहन करत नाहीत. सिस्टिममधील सडलेले चेहरे उघडे करतात.बोगस अपंग योजनेचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई करतात. आणि म्हणून त्यांना सतत बदली, निलंबन, दबाव याला स...

बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात

Image
बीडच्या डोंगर पट्ट्यातील निवडुंग वनस्पती धोक्यात च-हाटा परिसरात पांढऱ्या रोगाचा फैलाव; निवडुंग मोठ्या प्रमाणावर नष्ट ◆श्रीकृष्ण उबाळे ◆मो.9405344642 बीड:  बीड जिल्ह्यातील डोंगराळ व कमी पावसाच्या पट्ट्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक मानली जाणारी  निवडुंग वनस्पती  आज गंभीर संकटातून जात आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये  पांढऱ्या किडीचा (mealy bug)  प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढला आहे की च-हाटा गावासह आसपासच्या संपूर्ण डोंगरपट्ट्यात ही वनस्पती  जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर  आली आहे. निवडुंगाच्या खोडावर पांढऱ्या रंगाचा चिकट थर दिसू लागतो आणि काही आठवड्यांतच संपूर्ण झाड व्यापून टाकतो. ही कीड रस शोषून घेत असल्याने झाड पूर्णपणे कमजोर होते, पिवळे पडते आणि अखेरीस पूर्णपणे सुकून जाते. गेल्या काही वर्षांत कधीही न दिसलेला एवढा मोठा प्रादुर्भाव या वर्षी प्रथमच नजरेस पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. ग्रामीण आणि डोंगराळ भागात निवडुंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो-माती धूप होऊ नये म्हणून  मृदासंरक्षण  करतो, ...

इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'

Image
◆'इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे...!'◆ ◆ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642           आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा हा शब्द शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेहमी वापरण्यात येतो. शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. महाराष्ट्र आणि बळीराजा यांचं किती जिव्हाळ्याचं नातं आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्त बळीराजा कोण होता ? कसा होता ? या विषयी थोडीशी माहिती घेऊया.  ◆पुराणकथा◆     बळीराजाच्या संदर्भात महाभारत, भागवत आणि पद्मपुराण अशा विविध ठिकाणी कथा आढळते. पण गोष्ट अशी की प्रत्येक पुराणातील कथा वेगवेगळ्या आहेत. सर्वसामान्यपणे जी कथा सांगितली जाते ती अशी 'कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणतात. त्या दिवशी बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाते. असुर (राक्षस) यांचा राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष होता, दानशूरपणात खूप पुढे होता. त्याची शक्ती खूप वाढली होती. त्याने देव लोकांचा पराभव केला होता. मग व...

कुत्रे आणि समाज आरसा एकच आहे

Image
◆कुत्रे आणि समाज : आरसा एकच आहे...!◆             आजच्या समाजात ‘कुत्रे’ हा शब्द फक्त प्राण्यापुरता मर्यादित नाही. कुणाला कमी लेखायचं, कुणाचं वागणं दाखवायचं, कुणावर व्यंग करायचं- की झालं लगेच “अरे, तो तर कुत्र्यासारखा भुंकतो...!” असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर, समाजातल्या अनेक प्रवृत्ती या अगदी कुत्र्यांसारख्याच झाल्या आहेत. कुत्रं भुंकण्यासाठी प्रसिद्ध आहे- कारण असो वा नसो, त्यांना भुंकल्याशिवाय चैन पडत नाही. आजची माणसंही तशीच झाली आहेत. सोशल मीडियावर, राजकारणात, गावपातळीवर... कुणी काही बोललं की लगेच टोळकं भुंकायला लागतं. तथ्य, विवेक, संयम या गोष्टींचं काही घेणंदेणं नाही- फक्त आवाज मोठा हवा एवढंच....! काही कुत्रे पाळीव असतात- मालकाच्या ‘छो’वर चालतात. समाजातही असे बरेच ‘पाळीव’ माणसे आहेत. नेता, संस्थाचालक, किंवा आर्थिक मालक जे म्हणतील तेच करायचं. विचार स्वतःचा नसतो, पण आदेश मिळाला की “तुटून पडायचं ” हाच त्यांचा धर्म. काही कुत्रे मात्र मोकाट असतात. मालक नाही, नियंत्रण नाही-जसं मनात येईल तसं वागतात. शहरात, गावात, गल्लीबोळात, पानटपरीवर सगळीकडे त्या...

एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन

Image
एक अस्सल शिक्षक आणि संवेदनशील लेखक – प्रभाकरराव महाजन              प्रभाकरराव महाजन (माजी मुख्याध्यापक, राजस्थानी विद्यालय, बीड)- हे नाव बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आदराने घेतले जायचे. राजस्थानी विद्यालयाला ओळख निर्माण करून देणारे, अनुशासन, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभाकरराव महाजन सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेने केवळ निकालांची उंची गाठली नाही, तर संस्कारांचे झाड रुजवले. आज त्यांचा देह निखळला असला, तरी त्यांनी दिलेलं शिक्षण आणि विचारांची बीजं अनेकांच्या मनामध्ये कायम जिवंत राहतील. मी “चंपावती पत्र” या दैनिकामध्ये ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित ‘अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी’ या नावाने लेखमाला लिहीत होतो. त्या मालिकेतील एक लेख - “आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया”- सरांनी वाचला. त्या लेखाखाली मी दिलेली कथा त्यांना एवढी भावली की त्यांनी मला थेट फोन केला. फोनवरील त्यांचा आवाज अजूनही कानात घुमतो- “अहो, तुमचं नाव श्रीकृष्ण उबाळे का? च-हाटा गावचे का?” असं विचारून ते मनापा...

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड

Image
ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील- राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्यप्रमुखपदी निवड अध्यात्म, संस्कार आणि परिवर्तनाचा प्रवास              अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे आणि वारकरी संप्रदायातील नवे विचार रुजवणारे ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुळशी तालुक्यातील मोसे खोरे या अतिदुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. कोणताही वारसा, पाठबळ किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि श्रद्धेवर आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. लहानपणापासूनच संसाराची जबाबदारी अंगावर घेत त्यांनी पाणीपुरीच्या गाडीवर काम, पेपर वाटप, इस्त्री काम, ऑफिस बॉय अशी विविध छोटीमोठी कामे केली. या कष्टांमध्येही त्यांच्या अंतःकरणात भक्ती, भजन आणि कीर्तनाची गोड झुळूक वाहत राहिली. बालवयापासूनच कीर्तन आणि गायनाची आवड असल्याने त्यांनी २०१६ पासून कीर्तन...

ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस

Image
◆◆ज्ञानऋषींच्या दर्शनाने समृद्ध झालेला दिवस◆◆ (डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या भेटीचा अविस्मरणीय अनुभव)          कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात की त्या क्षणांचं स्मरण मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतं, आत्मा प्रफुल्लित करतो आणि विचारांच्या नव्या वाटा दाखवतो. असा एक क्षण माझ्या आणि नितीन महाराज पिसाळ यांच्या आयुष्यात आला- जेव्हा आम्हाला आजच्या काळातील ज्ञानऋषी, मानवतावादी चिंतक आणि लोकशिक्षक डॉ. आ. ह. साळुंखे सर यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आणि संवादाचा योग आला. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये डॉ. जयसिंगराव पवार सरांचा निरोप घेऊन साताऱ्याकडे निघालो होतो. प्रवास जरी लांब होता, तरी मनात उत्साह ओसंडून वाहत होता. कारण आज आपण त्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार होतो ज्यांनी महाराष्ट्रात विवेक, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि तुकारामांच्या विचारांची आधुनिक व्याख्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवली आहे. सुमारे सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेंडामाळ येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. राकेश दादा- म्हणजेच साळुंखे सरांचे सुपुत...