Vaari

*विठ्ठलाची वारी*

विठ्ठलाची वारी
सांगु किती गोड
दुष्काळी धारणीला
जसी पावसाची ओढ ||1||

विठ्ठलाची वारी
सांगु किती न्यारी
भेदाभेद नाही
एक नर नारी         ||2||

विठ्ठलाची वारी
आहे विश्वाचे सूत्र
एक एक अणु रेणु
मग आकाश एकत्र   ||3||

विठ्ठलाची वारी
साधु संतांनी पाहिली
अभंगाची पुष्पे
विठु चरणी वाहिली ||4||

विठ्ठलाची वारी
आहे आनंद तरंग
टाळ वीणा मृदंग
सारे विठु नामात दंग ||5||

विठ्ठलाची वारी
आसे भोळी भाबडी
सारे दीन दुबळे
कुठे नाही लबाडी  ||6||

विठ्ठलाची वारी
सारे दुःख तारी
येतो वारकरी
ऊर्जेने माघारी     ||7||

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'