फेसबुक
श्रीकृष्ण उबाळे यांची एका सत्य घटनेवर आधारित कविता....!!
*फेसबुक*
दोघांनाही लागली होती
नव्या जोडीदाराची भुक
पर्याय ते शोधु लागले
हुडकु लागले फेसबुक ||1||
फ़ेसबूकवर नवे मित्र झाले
चॅटींगने एकत्र आले
प्रेमाचा वर्षाव होऊ लागला
आंतरात्मा गाऊ लागला ||2||
भेटीचे ठिकाण ठरवले
एकमेकात नवे हरवले
एकमेकांना प्रत्यक्ष पाहिले
शिव्या मार त्यानी वाहिले ||3||
दोघांचा चेहरा झाला
कावरा बावरा
ती होती बायको
तो होता नवरा ||4||
सुरु होती त्यांची
मस्तच फाइटिंग
खोट्या अकाऊंटवरुन
करीत होते चॅटींग ||5||
फेसबूकचा वापर
कसाही होतो
चांगला वाईट
कधी असाही होतो ||6||
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9406344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment